परिसंवादाचे शेतकयांची लातूर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबईच्या लातूर विभागीय केंद्राच्यावतीने मंगळवार,दि.२५ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता लातूरच्या डॉ.भालचंद्र रक्तपेढी सभागृहात प्रसिध्दी माध्यमे आणि आजची आव्हाने या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबईच्या लातूर विभागीय केंद्राचे अध्यक्ष माजी खा.डॉ.जनार्दन वाघमारे यांच्या परिसंवादाचे आयोजन अध्यक्षतेखाली होणार्या या परिसंवादामध्ये महात्मा गांधी मिशन विद्यापीठ,औरंगाबादचे कुलगुरु डॉ.सुधीर गव्हाणे, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर आणि झी २४ तासचे जिल्हा प्रतिनिधी शशिकांत पाटील हे सहभागी होवून प्रसिध्दी माध्यमे आणि आजची आव्हान या विषयावरील परिसंवादात भाष्य करणार आहे. तरी सदरील परिसंवादाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित आयोजन राहन या ज्वलंत परिसंवादाचा लाभ घ्यावा,असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबईच्या लातूर विभागीय केंद्राचे सचिव प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार, कोषाध्यक्ष विवेक सौताडेकर,सदस्य ऍड.मनोहरराव गोमारे,लक्ष्मीरमण लाहोटी, प्रा.शाम आगळे,प्राचार्य डॉ.रमेश दापके उस्मानाबाद, प्राचार्य डॉ.कुसूम मोरे,प्रा.डॉ. सुनीता गिरवलकर, रुक्साना मुल्ला आदिंनी केले आहे.