इंदापूर (पुणे) : रेडणी येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व लहान मुलांना पोलिओ लस देण्याचे लसीचे उद्घाटन रेडणी गावचे सरपंच माननीय श्री भीमराव आबा गोविंद काळे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र निरवांगी अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत महाजन सर, आरोग्य सहाय्यक श्री राहुल देवकर तसेच रेडणी येथील ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा सोहळा संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ० ते ५ वयोगटातील लहान मुलांना पोलिओ लस पाजण्यात देण्यात आली.तसेच डॉक्टर महाजन सरांनी पल्स पोलिओ मोहिमेची प्रस्तावना करून मोहिमेचे निर्मूलन कशा पद्धतीने होत आहे याबाबत सविस्तर माहिती सांगून आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राथमिक आरोग्यकेंद्र निरवांगी येथील आरोग्य सेवक उमेश आरोग्य सेविका श्रीमती स्मिता साठे आशाताई गवळी,अतुल कांबळे, सुरेश कांबळे तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
• SADIK DILAWAR SHAIKH